Nanded News : सावधान! SBI च्या नावाने आलेली लिंक क्लिक केली की मोबाईल होतो हॅक; या जिल्ह्यातील नागरिक हैराण

SBI/Cyber Crime : नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात एसबीआयच्या नावे मोबाईलवर लिंक येते आणि त्यावर क्लिक केलं की मोबाईल हॅक होत आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Nanded News
Nanded NewsSaam Digital

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी

सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आज प्रत्येकांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल वरच सर्व व्यव्हार होत आहेत.मोबाईल मुळे जग अगदी जवळ आलं आहे. परंतु मोबाईल वापरण्या जितका फायद्याचा आहे तितकाच नुकसानीचा देखील आहे. सायबर क्राईम सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत.असाच काहीसा प्रकार सध्या नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात सुरू आहे.

Nanded News
VIDEO : मोठी बातमी! अजित पवार गटाच्या 6 आमदारांनी घेतली जयंत पाटील यांची भेट; पुन्हा करणार घरवापसी?

दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईलवर सध्या एक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने मॅसेज येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या लिंक वर क्लिक करा असा मॅसेज येत आहेत. या लिंक वर क्लिक केल्यावर नागरिकांचा मोबाईल काही वेळात हॅक होत आहे.सध्या या प्रकारामुळे या दोन्ही तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. मोबाईल बंद पडल्याने नागरिक सध्या मोबाईल चालू करण्यासाठी मोबाईल शॉपी गर्दी करीत आहेत.

बँकेच्या लिंकवर क्लिक केल्याने मोबाईल हॅक होत आहे. नागरिक आपल्या खात्यातील पैसे हॅकरने काढून घेतले असावेत अशी भीती देखील अनेक नागरिकांमध्ये निर्माण झालीय. परंतु असे मॅसेज बँकेकडून करण्यात येत नाहीत. अशा मॅसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठल्याही लिंक वर क्लिक करू नये, काही संशय आला तर जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क करावा असं आवाहन बँकेतर्फे करण्यात आलं आहे.

Nanded News
Jamner Crime : पैसे मोजून देण्याचे सांगत २० हजार हिसकावून चोरटा पसार; तोंडापूर येथील बँकेतील प्रकार

इंटरनेटच्या या युगात अनेकांना फ्रॉड करणारे कॉल येत असतात. याला अनेक जण बळी पडतात आणि आर्थिक फसवणूक होत असते. त्यामुळे मोबाईल वापरताना आशा घटना पासून सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहे. जेणेकरून फसवणूक होणार नाही आणि आपली माहिती देखील लीक होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com