Jamner Crime : पैसे मोजून देण्याचे सांगत २० हजार हिसकावून चोरटा पसार; तोंडापूर येथील बँकेतील प्रकार

Jalgaon News ; तोंडापूर फर्दापुर रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयडिबिआय बँकेच्या शाखेत आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ढालसिंगीचे शेतकरी योगेश गाढवे हे पैसे काढण्यासाठी आले होते.
Jamner Crime
Jamner CrimeSaam tv
Published On

तोंडापूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील आयडीबीआय बॅकेच्या आत प्रवेश करत पैसे मोजून देतो; या बहाण्याने शेतकऱ्याचे २० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

Jamner Crime
Chandrapur News : देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित; पक्षविरोधी कारवायांचा ठपका

तोंडापूर फर्दापुर (Jamner) रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयडिबिआय बँकेच्या शाखेत आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ढालसिंगीचे शेतकरी योगेश गाढवे हे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी ५० हजार रुपयांची रोकड काढली. यावेळी त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने तुमच्या नोटा फाटलेल्या असल्याने मोजुन देतो; अस म्हणत गाढवे याच्या हातातून २० हजाराचे बंडल घेतले. यानंतर ते खिशात घालून बॅकेच्या (Bank) बाहेर उभ्या असलेल्या दोन साथीदारांसह दुचाकीने पळ काढला.  

Jamner Crime
KDMC News : कॉलेज परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर; पुणे ठाण्यानंतर कल्याणमध्ये केडीएमसीची कारवाई

शेतकऱ्यांने आरडाओरडा केल्याने बॅक मनेजर व कर्मचारी जमा झाले. झालेला सर्व प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकाराने बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. बॅकेत सुरक्षा रक्षक असता तर हा प्रकार घडला नसता; अशी चर्चा होत आहे. या प्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com