Winter Hacks : कडाक्याच्या थंडीतही स्वेटरशिवाय शरीर राहील उबदार, थंडीला पळवून लावतील 'या' ५ भन्नाट ट्रिक्स

Tips For Stay Warm Without Sweater : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक वेळी स्वेटर किंवा जॅकेट घालण्याची गरज नसते. थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या छोट्या गोष्टी उपयोगी ठरतात, जाणून घेऊयात.
Tips For Stay Warm Without Sweater
Winter Hacks AI PHOTO
Published On: 

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील तापमान कमी होऊ लागते. अशा वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण स्वेटर, जॅकेट, शाल आणि मफलरचा वापर करतात. मात्र, केवळ उबदार कपडे घालूनच शरीराचे तापमान टिकवता येते असे नाही. आपल्या रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत काही छोटे बदल केल्यास शरीराला उबदार ठेवण्यास मदत होऊ शकते. चला तर स्वेटर-जॅकेटशिवायही शरीर उबदार ठेवण्यास मदत करणाऱ्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात.

सकाळी कोमट प्या

हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे हा शरीराला आराम देणारा चांगला पर्याय आहे. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. थंडीमध्ये तहान कमी लागली तरी शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे नियमित अंतराने पाणी पिण्याची सवय लावा.

आहारात गरम पदार्थांचा समावेश

हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारात गरम सूप, वरण, भाज्यांचे पदार्थ, डाळी आणि पौष्टिक खिचडी यांचा समावेश करा. तसेच तीळ, शेंगदाणे, बदाम, अक्रोड आणि गूळ यांसारखे पदार्थ योग्य प्रमाणात खाऊ शकता. यामधून शरीराला आवश्यक पोषक घटक आणि ऊर्जा मिळते. तसेच संतुलित आहार घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

आले- तुळशीच्या चहा

हिवाळ्यात गरम चहा किंवा काढा प्यायला अनेकांना आवडतो. आल्याचा चहा, तुळशीचा चहा किंवा गरम हर्बल टी यांचे सेवन केल्याने शरीराला उबदारपणा जाणवतो. आल्यामध्ये असणारे नैसर्गिक घटक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. मात्र, चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त ठेवू नका.

शरीराची हालचाल

हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण सकाळी उशिरा उठतात आणि व्यायाम करणे टाळतात. मात्र, सतत एकाच जागी बसून राहिल्याने शरीराला थंडी अधिक जाणवू शकते. त्यामुळे घरामध्येच हलका व्यायाम, योगासने, स्ट्रेचिंग किंवा काही मिनिटे चालण्याचा सराव करा. शरीराची हालचाल केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास आणि स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होण्यास मदत होते. दररोज साधारण २० ते ३० मिनिटे शारीरिक हालचाल करण्याचा प्रयत्न करा.

Tips For Stay Warm Without Sweater
Steel Tap Cleaning : बाथरूममधील स्टीलच्या नळावर पांढरे डाग पडलंय? 'या' घरगुती ट्रिकने करा चकाचक

गरम पाण्याने अंघोळ करा

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतो आणि थंडीपासून तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र, खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडू शकते. अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो आणि शरीराची थंडी सहन करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. त्यामुळे दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपताना खोलीचे तापमान आरामदायी ठेवा. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य चादर किंवा ब्लँकेटचा वापर करा.

घरातील वातावरण उबदार ठेवा

हिवाळ्यात बाहेरील थंड हवा घरात येऊ नये यासाठी खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद ठेवा. दिवसा ऊन येत असल्यास खिडक्यांचे पडदे उघडे ठेवा, जेणेकरून घरात नैसर्गिक उबदारपणा राहील. रात्री थंडी वाढल्यावर खिडक्या बंद करा.

गरम सूप प्या

हिवाळ्यात गरम सूप हा आहारातील चांगला पर्याय ठरू शकतो. टोमॅटो सूप, मिक्स व्हेज सूप, मूगडाळ सूप किंवा गाजर सूप यांचा आहारात समावेश करा. गरम सूप प्यायल्याने शरीराला तात्पुरता उबदारपणा जाणवतो. त्याचबरोबर भाज्यांमधून जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक मिळतात.

थंड हवेत जास्त वेळ राहणे टाळा

हिवाळ्यात विशेषतः सकाळी आणि रात्री तापमान अधिक कमी असू शकते. अशा वेळी थंड हवेत जास्त वेळ राहणे टाळा. बाहेर जाणे आवश्यक असल्यास एकाच जाड कपड्याऐवजी कपड्यांचे अनेक हलके थर घाला. यामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि थंडीचा अधिक त्रास होणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.