Weight Loss Exercise: नवीन वर्ष सुरू होण्याआधी करायचंय वजन कमी? रोज करा हा एक व्यायाम, झटपट दिसेल फरक!

Shruti Vilas Kadam

वजन कमी करण्यास मदत होते

रोज चालल्यामुळे शरीरातील कॅलरी खर्च होतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. योग्य आहार आणि नियमित चालण्याची सवय ठेवल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.

to walk | pinterest

हृदय निरोगी राहते

चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नियमित चालल्याने रक्ताभिसरण सुधारते. तसेच रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

to walk | pinterest

पचनक्रिया सुधारते

जेवणानंतर थोडे चालल्याने पचनक्रियेला मदत होते. यामुळे पोट फुगणे आणि जडपणा कमी होण्यास मदत मिळू शकते. नियमित चालण्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

When to Walk

मानसिक ताण कमी होतो

रोज चालल्यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते. चालताना शरीरात आनंदी वाटण्यास मदत करणारे हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत मिळू शकते.

Walking

रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत

चालण्यामुळे शरीरातील स्नायू ग्लुकोजचा वापर करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः जेवणानंतर थोडे चालणे फायदेशीर ठरू शकते.

Walk | pinterest

हाडे आणि स्नायू मजबूत होतात

नियमित चालल्यामुळे पायांचे स्नायू सक्रिय राहतात. तसेच हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. यामुळे शरीराची ताकद आणि चालण्याची क्षमता वाढू शकते.

Walking | pinterest

झोप चांगली लागते

दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते. नियमित चालण्यामुळे थकवा आणि ताण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

Walk | saam tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Walk | saam tv

Saree Draping Tips: साडी नेसल्यावर पदर-निऱ्या विस्कटतात? चापून चोपून साडी नेसण्यासाठी फॉलो करा या ७ टिप्स!

Saree Draping Tips | Saam Tv
येथे क्लिक करा