Maharashtra Political Reaction Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Reaction: 'समृद्धी'च्या अपघातांना सरकारच जबाबदार'; तिखट राजकीय प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजचं राजकारण

Maharashtra Political Reaction: विविध तिखट राजकीय प्रतिक्रियांमधून दिवसभराचं राजकारण समजून घेऊयात.

Vishal Gangurde

Maharashtra Political Reaction:

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. आज रविवारी देखील महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. या महामार्गावरील अपघातात होणाऱ्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या होणाऱ्या अपघातांना सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विविध तिखट राजकीय प्रतिक्रियांमधून दिवसभराचं राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)

रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातावरून सरकारवर टीका केली आहे. 'समृद्धी महामार्गावरील सर्व अपघातांना सरकारच जबाबदार आहे. या लोकांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी ट्विट करत समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी योग्य पाऊल उचलली पाहिजे,अशी मागणी केली. 'समृद्धी महामार्गावर आतापर्यंत एकूण ७२९ अपघात झाले आहेत. महामार्गावर २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले.

'महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवं. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य पाऊले उचलली पाहिजेत, असेही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ' प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस जात नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ऐवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलंय, यामुळे पोटदुखी आहे. जळफळाट आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला.

'जी-२० सारखं अध्यक्षपद मिळवलं. काल ऑलम्पिकची बैठक पहिल्यांदा भारतामध्ये होते. येत्या काळात जनता यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

SCROLL FOR NEXT