Sharad Pawar: पोलिसांची ड्युटी महत्वाची, ११ महिने काम केल्यावर तरुणांनी पुढे काय करायचं? कंत्राटी भरतीवरून पवारांची सरकारवर टीका

Sharad pawar News: शरद पवार यांनी शिंदे सरकरावर जोरदार टीका केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam tv
Published On

Sharad Pawar News:

मुंबई पोलीस दलातील तीन हजार कंत्राटी भरतीवरून विरोधकांडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकरावर जोरदार टीका केली आहे. 'पोलिसांची ड्युटी महत्वाची आहे. ११ महिने काम केल्यावर तरुणांनी पुढे काय करायचं? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकरावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी शरद पवार यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून शिंदे सरकारला लक्ष्य केले.

शरद पवार म्हणाले, 'महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, पण नंतर आमदार फुटले. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजप आहे? भाजप कमी होत आहे. हे दिवसेंदिवस सिद्ध होत आहे'.

Sharad Pawar
Political News: 'मोदी स्टेडियमवर पाक खेळाडूंवर पुष्पवर्षाव', उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला हल्लाबोल

'सत्ता लोकांसाठी असते. कंत्राटी पद्धतीने नोकरी म्हणजे काय? त्याला नोकरीची खात्री नाही. केवळ ११ महिन्यांसाठी काम मिळत आहे. मी राज्यमंत्री असल्यापासून विधिमंडळात काम केले. गृह खातं माझ्याकडे होतं. त्यामुळे पोलिसांची ड्युटी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे. तरुणांनी ११ महिने काम केल्यावर पुढे काय करायचं? असा सवाल करत शरद पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

'कंत्राट भरतीचा निर्णय घातक आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी योग्य नाही. कंत्राटी पद्धतीत कोणत्याही आरक्षणानुसार भरती नाही. त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

Sharad Pawar
Manoj Jrange Patil: जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तमाशा कलावंतांना फटका; मराठवाड्यात फडांना परवानगी नाकारली

'राज्यात महिला आणि मुली किती बेपत्ता झाल्या. गेल्या ५ महिन्यात १९ हजार मुली सापडत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी काय करायचं? ही बाब समाजाच्या दृष्टीने घातक आहे, असं म्हणत पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com