सचिन बनसोडे, प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलेले मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. राज्यभर मनोज जरांगे यांचे दौरे, सभांचा धडाका सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनांचा मोठा फटक तमाशा कलावंतांना बसला असून मराठवाड्यात कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर सावरत असलेल्या तमाशाला (Tamasha) पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दसरा ते दिवाळी दरम्यान मराठवाड्यात तमाशा आयोजनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य तमाशा फड संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर (Raghuvir Khedkar) यांनी याबाबत माहिती दिली असून "सरकारने यात हस्तक्षेप करून आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला १० दिवसांची मुदत दिली आहे. यानंतर ते काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष असून याच पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.
वीस तमाशा फडांना फटका बसणार?
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दरवर्षी दसरा ते दिवाळी दरम्यान तमाशाचे फड जात असतात. ऊस तोडणी कामगारांची संख्या या भागात अधिक असुन दिवाळीपूर्वी ऊस तोडणी कामगार हे कामानिमीत्त दुसऱ्या शहरात जातात.. त्यामुळे जवळपास वीस फड मालकांना या बंदीचा फटका बसण्याची शक्यता रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.