Taj Hotel Blast Threat: 'ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट..' धमकीच्या कॉलने खळबळ; आरोपी अटकेत

Mumbai Police Threat Call: एका व्यक्तीने मुंबई फायरब्रिगेड कंट्रोलला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली होती.
Mumbai Police Threat Call
Mumbai Police Threat CallSaamtv
Published On

Tal Hotel Blast Threat:

मुंबईमध्ये धमक्या देण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ३६ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार (14 ऑक्टोबर) रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायरब्रिगेड कंट्रोलला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करू शकता, अशी धमकी दिली. या धमकीच्या कॉलमुळे पोलीस प्रशासनाची एकच धावपळ झाली.

यानंतर अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस ताबडतोब बॉम्ब शोधक व निकामी पथकासह ताज हॉटेल परिसरात पोहोचले. पोलिसांनी ताज हॉटेलची एक तास झडती घेतली, मात्र असा कोणताही प्रकार आढळून आला नाही.

Mumbai Police Threat Call
Dhangar Reservation: 'धनगर आरक्षणाला मुठभर आदिवासींचा विरोध..' आमदार गोपीचंद पडळकर

पोलिसांनी कॉलरचा नंबर तपासला असता त्याने फायर ब्रिगेड कंट्रोलला कॉल करण्यापूर्वी 28 वेळा मुंबई पोलीस कंट्रोलला कॉल केल्याचे दिसून आले. बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करत धरमपाल सिंग (36 वर्षे) याला अटक करण्यात आली. तो नवी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी असून हा कॉल का केला याबाबत सध्या तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police Threat Call
Bengaluru Cyber Crime: एका खोलीत कंपनी, ८४ बँक खाती अन् ८५४ कोटींचा स्कॅम; इंजिनियर तरुणांच्या प्रतापाने पोलिसही हादरले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com