Maharashtra Jobs Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Jobs: महाराष्ट्रात सर्वात मोठी शिक्षक भरती; ५,५०० प्राध्यापक पदे भरली जाणार

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती केली जाणार आहे. आचारसंहिता संपताच भरती होणार आहे.

Siddhi Hande

राज्यात ५,५०० पदांसाठी शिक्षकभरती

आचारसंहिता संपताच सुरु होणार भरती

महाराष्ट्रात ७० हजार पदांसाठी भरती

राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्रवर्तनातून साकारलेल्या पिल्लई विद्यापीठ, नवी मुंबईचे भव्य आणि औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयांमधील सुमारे ११ हजार रिक्त जागा रिक्त आहेत. यापैकी ५,५०० जागा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली आहे.७०० विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती केली जाणाार आहे. केवळ महाविद्यालयेच नव्हे, तर विद्यापीठ कॅम्पसमध्येही ७०० प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.ृ ​या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली प्राध्यापक भरती आता सुरू होणार असून, यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

राज्यात ७० हजार पदांसाठी भरती

राज्यात लवकरच नोकरभरती होणार आहे. तब्बल ७० हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २० हजार पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल.यासंदर्भातील नियमावली सुधारणेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT