Police Bharti: तयारीला लागा! पोलिस भरतीची तारीख ठरली; या दिवशी होणार मैदानी चाचणी

Police Bharti Started on 16th February 2026: राज्यात पोलिस भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस भरतीची प्रत्यक्ष सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होणार आहे. पोलिस भरतीसाठी शारिरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
Police Bharti
Police BhartiSaam Tv
Published On
Summary

पोलिस भरतीची प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून होणार

मैदानी चाचणी घेतली जाणार

पुण्यात १६३३ पदे भरली जाणार

राज्यात पोलिस भरती जाहीर झाली आहे. प्रत्यक्ष पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात १६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पुणे शहर पोलिस दलात एकूण ६३३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी तब्बल ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे.

Police Bharti
Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

पोलिस भरतीच्या पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने तयारीसाठी आता पोलिक प्रशासन सज्ज झालं आहे. यासाठी पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोन मैदानाव चाचणी होणार आहे.

या भरतीमध्ये अनेक पदे आहेत. पोलिस अंमलदार, वाहनचालक, पोलिस बँडसमन अशा एकूण १६३३ पदांचा समावेश आहे. पोलिस भरतीची मैदानी आणि शारीरिक चाचणी १६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कशी असणार भरती प्रक्रिया? (Police Bharti Recruitment Process)

शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

यामध्ये उमेदवारांची उंची आणि छाती मोजली जाणार आहे.

१०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर),गोळाफेक याद्वारे उमेदवारांची निवड करणार आहे. या चाचणीसाठी १०० गुण असणार आहे.त्यापैकी ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.

Police Bharti
Big scam in police recruitment : पोलिस भरतीत मोठा घोटाळा उघड, भरती उमेदवारांकडून ३ लाखांची वसुली,पाहा व्हिडीओ

भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये. यासाठी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणारआहे. यामुळे उमेदवारांची उपस्थिती धावण्याची वेळ याबाबत माहिती मिळणार आहे.

Police Bharti
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com