Teachers in Maharashtra call for a state-wide 'School Bandh' tomorrow, July 9, protesting against excessive non-academic burdens like BLO election duties. saam tv
महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक, उद्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन; नेमक्या मागण्या काय?

Maharashtra School Bandh Tomorrow Teachers Strike: शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक व बीएलओ कामांच्या निषेधार्थ उद्या, ९ जुलै रोजी राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

शिक्षण क्षेत्रातील अनेक गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे महाराष्ट्र शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा निषेध करत, राज्यातील शिक्षक मध्यवर्ती संघटनांनी उद्या, ९ जुलै २०२ रोजी राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद' या नामांकित संघटनेने आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून, राज्यभरातील शाळा बंद ठेवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शिक्षकांना वारंवार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर अशैक्षणिक कामांवर पाठवले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे नुकसान होते. शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामांमधून पूर्णपणे मुक्त कराव राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त शिक्षकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी शाळांच्या वेळांत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार, ३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीएलओ शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करताना त्यांच्या तासिका शक्यतो कमी ठेवाव्यात व त्या प्राधान्याने सलग ठेवून शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरविण्याच्या सूचना आहेत.राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना बीएलओ शिक्षकांबाबत पत्र दिले होते. त्यात, 'ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यापन तासिका शक्यतो कमीत कमी व सकाळ, दुपार दोन्ही सत्रांत भरणाऱ्या शाळा सकाळच्या एकाच सत्रामध्ये ३० जुलैपर्यंत कशा भरवायच्या? बीएलओ शिक्षकांना अध्यापनाचे सलग तास देण्याचे नियोजन कसे शक्य आहे? शाळा सांभाळून 'बीएलओ'चे काम करणे हा शिक्षकांचा मानसिक, शारीरिक छळ आहे. सलग ठेवाव्यात, बीएलओ म्हणून नियुक्ती नसलेल्या शिक्षकांनी बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या कामात साहाय्य करावे,जेणेकरून शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही,' असे नमूद करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, बीएलओ असलेल्या शिक्षकांना मतदारयाद्यांचे काम करण्यास वेळ मिळण्यासाठी राज्यातील शाळांचीच वेळ बदलण्यात येणार आहे.बीएलओ शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करताना त्या सलग ठेवून शाळा शक्यतो सकाळच्या सत्रामध्ये भरविण्याचे नियोजन ३० जुलैपर्यंत करावे, अशा सूचना शिक्षण उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

उद्या ९ जुलै रोजी होणाऱ्या या राज्यव्यापी आंदोलनामुळे संपूर्ण राज्यातील शाळांमधील शैक्षणिक कामकाज बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'शिक्षक एकता जिंदाबाद!', 'न्याय मिळालाच पाहिजे!' आणि शिक्षण वाचवा • शिक्षक वाचवा • भविष्य घडवा' या घोषणांसह शिक्षक वर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरणार असल्याचे दिसत आहे. शिक्षकांना देण्यात आलेले असैक्षणिक कामे तात्काळ थांबवावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी शासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT