SSC Result 2026 Saam Tv
महाराष्ट्र

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

maharashtra ssc result 2026 date and time: दहावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळणार आहे.

Priya More

Summary:

  • महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर होणार

  • दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहायला मिळणार

  • विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल

  • निकालापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. ८ मे रोजी म्हणजे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

निकालासंदर्भात सकाळी ११ वाजता राज्य मंडळ कार्यालयात शिक्षण मंडळाकडून अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता उद्याच्या निकालाकडे लागले आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहाल?

https://results.digilocker.gov.in

https://www.mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://mahahsscboard.in

दहावीचा निकाल कसा पाहाल?

- सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्या.

- होमपेजवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून माहिती भरा.

- त्यानंतर 'VIEW RESULT' या बटनावर क्लिक करा.

- यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल.

- रिझल्टची प्रिंट काढून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT