SSC Result 2026: दहावीचा निकाल या दिवशी लागणार; संभाव्य तारीख आली समोर

SSC Result 2026 Date Update: दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार असा प्रश्न पडला आहे. लवकरच पुढच्या दोन आठवड्यात कधीही दहावीचा निकाल लागू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
SSC Result 2026
SSC Result 2026Saam Tv
Published On
Summary

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या दिवशी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता

संभाव्य तारीख आली समोर

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर आता लवकरच दहावीचा निकालदेखील लागू शकतो. दरम्यान, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल.

दहावीची परीक्षा होऊन जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. १८ मार्च रोजी दहावीच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर आता दीड महिना होत आला आहे. लवकरच पुढच्या काही दिवसात दहावीचा निकाल लागू शकतो.

SSC Result 2026
SSC Result 2026: दहावीचा निकाल कसा पाहायचा? या वेबसाइट आताच नोट करा

दहावीचा निकाल या दिवशी लागण्याची शक्यता (SSC Result 2026 Tentative Date)

दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर लगेचच लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यानंतर लगेचच १० ते १२ दिवसात म्हणजेच दोन आठवड्यात कधीही लागू शकतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्र बोर्डाकडून (MSBSHSE) माहिती देण्यात येईल.

दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु आहे. लवकरच ही तपासणी पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. तुम्ही दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी वेबसाइटवर जाऊन फक्त काही सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे,

SSC Result 2026
HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

दहावीचा निकाल कुठे अस् कसा पाहाल? (How to Check SSC 2026 Result Online Websites)

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org (१० वी साठी)

mahahsscboard.in

वरील वेबसाइटपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर विद्यार्थ्यांचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल. याचसोबत डिजिलॉकरवरदेखील तुम्ही निकाल पाहू शकतात.

SSC Result 2026
HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com