विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, दहावी-बारावी निकाल कधी लागणार? महत्त्वाची अपडेट समोर

ssc and hsc result update : दहावी-बारावी निकाल कधी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
hsc and ssc result
hsc and ssc result update Saam tv
Published On
Summary

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावी आणि बारावीचा निकाल येत्या काही आठवड्यात जाहीर होणार

शिक्षण बोर्डाकडून अधिकृतपणे तारीख लवकरच जाहीर होणार

अक्षय बडवे, साम टीव्ही

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल लांबणीर पडण्याची शक्यता असताना नवीन अपडेट समोर आली आहे. सरकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु दहावी-बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल डिजीलॉकवर बारावीचा निकालाबाबत लवकरच निकाल जाहीर होणार असल्याचे नोटिफिकेशन येत आहेत. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल १० ते १५ मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण बोर्डाकडून येत्या काही दिवसांत निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

hsc and ssc result
CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान संपन्न झाली. बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. यात ८ लाख ६४ हजार ४८० मुलं आणि ७ लाख ४७ हजार १३६ मुलींचा समावेश आहे.

शिक्षण बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी काय इशारा दिला?

तत्पूर्वी, बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बढती आणि बदली दोन वर्षांवरून चार ते सहा वर्षांवर नेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. त्याचा फटका निकालावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे निकाल वेळेत लागणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com