Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Rain Update: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाचं सावट; पुढील ४ तास महत्वाचे; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Update: विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाला सुरुवात. हवामान खात्याकडून अलर्ट जारा

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai Weather Report:

मुंबईसह महाराष्ट्रात आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे विसर्जन होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असतानाच आता मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

मागील अर्ध्या तासापासून मुंबई पश्चिम उपनगरातील सांताक्रुज विलेपार्ले अंधेरी वर्सोवा गोरेगाव या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोबतच विजांचा कडकडाट देखील ऐकायला मिळत आहे. यामुळे मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू समुद्रावर गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी देखील आपल्या बाप्पाचे विसर्जन त्वरित करून घराकडे निघणे पसंत केले आहे. यामुळे सध्या जुहू चौपाटीवरील गर्दी कमी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

मुंबईत गणपती आगमनाबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती. कालपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. काल सकाळपासूनच मुंबईच्या हवेतील उकाडा वाढल्यानंतर दुपारी मुंबईत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. वातावरणातील आर्द्रतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना या पाऊससरींनी दिलासा मिळाला.

पुढील ४ तास महत्वाचे

गुरुवारीही अशाच प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईसह उपनगरांना पुढील ४ तास महत्वाचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मात्र आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मंडळाकडून भव्य मिरवणुका काढल्या जातात या मिरवणुकांवर मात्र अचानक आलेल्या या पावसाने विर्जन पडले असेच म्हणावे लागेल. भक्तांच्या उत्साहावर देखील पावसाचे विरजण पडले आता दुपारनंतर मुंबईतील सर्वच घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर गणेश मंडळांना आणि भक्तांना गणपतीच्या मिरवणुका आटोपत्या घ्याव्या लागतील आणि विसर्जन वेळेत उरकून घ्यावे लागेल असेच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

SCROLL FOR NEXT