अक्षय बडवे, प्रतिनिधी
लाडक्या गणरायला निरोप देण्यासाठी गणपती मंडळे सज्ज झाली आहेत. गुरूवार (२८, सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला राज्यभर गणपती विसर्जन असतानाच वरुणराजाही हजेरी लावणार आहे. राज्यात उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशीला वरुण राजाची उपस्थिती राहणार असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात (Pune Rain) पावसाने हजेरी लावली असून अनंतचतुर्दशी सह पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज पुणे, वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात ३ ते ४ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 96% पाऊस पडल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. सप्टेंबर मध्ये झालेला पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासादायक देखील आहे.
सलग २ दिवस मुसळधार पाऊस...
दरम्यान, एकीकडे गणपती उत्सव सुरू असतानाच पुणे शहरात सलग दोन दिवस पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे गणपती दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत 26 मिमी पावसाची नोंद झाली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.