Rain update news
Rain update news  saam tv
महाराष्ट्र

Rain Update : यवतमाळसह जालन्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतीचं मोठ नुकसान

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पण आज दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच दैना उडवली आहे. मुसळधार पावासाने यवतमाळ (Yavatmal) आणि जालन्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसाचा (Rain) यवतमाळ शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. (yavatmal rain news)

यवतमाळच्या मारेगाव शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अचानक बरसल्याने शेतात काम करणारे शेतकरी शेतमजुराची दाणादाण उडाली. उसंत घेतलेल्या पावसाने कडाक्याच्या विजा,वादळ व ढगफुगी पावसामुळे तालुक्यात शेतासह घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला. मागील पंधरवड्यात संततधार पावसाने शेती खरडून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. त्याची मदत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर प्रशासन केवळ सर्व्हे करुन समाधान व्यक्त करीत आहे.

जालन्यात मुसळधार पावसाची हजेरी

दरम्यान, आज जालना शहरासह परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसानं हजेरी लावल्यानं शहरातील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती.आज दुपारच्या सुमारास अचानक आकाशात मेघ दाटून आले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज झालेल्या पावसामुळे नागरिकांची उकाड्यातून तात्पुरती सुटका झाली आहे. काल दिवसभर उन्हाचा कडाका असल्यानं शहर आणि परिसरात उन्हामुळे नागरिक त्रासले होते. अखेरीस आज पावसानं हजेरी लावल्यानं नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

Varanasi: नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून शुभेच्छा कुणी दिल्या? Video समोर!

Ramdev Baba : रामदेव बांबांचा सुप्रीम कोर्टाला नमस्कार, कोर्टही म्हणालं, आमचाही प्रणाम! पण...

होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर BMC प्रशासन खडबडून जागं, बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात| Ghatkopar Hoarding collapse

SCROLL FOR NEXT