मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पण आज दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. अंबरनाथ शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं कल्याण-कर्जत राज्यमार्ग पाण्याखाली गेला. विमको नाका, डीएमसी कंपनी या परिसरात पावसाचं पाणी रस्त्यावर आल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, यापूर्वीही महामार्गावर सखल भागात अनेकदा पाणी साचलं होतं, तेव्हाही वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे भविष्यात रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
कोकणात मागील १२ तासापासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. रत्नागिरी-चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला. कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.पुणे,कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटातही पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.नारळी पौर्णिमेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गटार साफ न केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसत आहे. पावसामुळे चिपळूणमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे.मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.