निती आयोगाच्या बैठकीत CM एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

निती आयोगाच्या बैठकीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Niti Aayog Meeting in Delhi
Niti Aayog Meeting in Delhisaam tv
Published On

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वर्तुळात विरोधकांकडून टीका-टीपण्ण होत असतानाच आता राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडली. या निती आयोगाच्या बैठकीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. निती आयोगाच्या (Niti Aayog Meeting) बैठकीत राज्याचे (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरवरुन केंद्र सरकारसह भाजपवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही, असं म्हणत पवार यांनी भाजपवर टीका केलीय.

Niti Aayog Meeting in Delhi
कौतुकास्पद ! रोहित शर्माने मोडला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मोठा विक्रम, वाचा सविस्तर

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्यानं भाजपवर विरोधकांकडून हल्लाबोल होत आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय.यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल,अशी अपेक्षा करूयात.

किरण पावसकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर

कही लोकांनी निती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित केला. ज्यांनी केला त्यांच्या मानसिकतेची कीव करण्यासारखी आहे. ज्यावेळी राष्ट्रपतींचा शपथविधी होता त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं होतं. हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे. ज्या राज्यात योगींना जास्त मतं मिळाली ते मात्र तिसऱ्या रांगेत उभे होते. त्यावेळी कुणीही हा प्रश्न विचारला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मनात असे प्रश्न आले असते तर, ते देशाचे पंतप्रधान म्हणून दिसले नसते. काहींची मानसिकता अशी आहे, ते फक्त त्यांच्या मतदार संघ, माझा तालुका, माझा जिल्हा आणि माझे कुटुंब यामध्येच ते रमत आहेत, असं म्हणत रोहित पवारांचं नाव घेता एकनाथ शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com