नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ५९ धावांनी विजय झाला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने टी-२० मालिकेत ३-१ आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना फ्लोरिडाच्या लॉडरहिलच्या सेंट्रल ब्रोवार्ड पार्कमध्ये रविवारी ७ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. दरम्या, चौथ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, धमाकेदार सुरुवात केल्यानंतर रोहितने १६ चेंडूत ३३ धावा कुटल्या. रोहितने या ३६ धावांच्या खेळीत दोन चौके आणि तीन षटकार ठोकून (International Cricket) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. याचदरम्यान रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर येऊन नवा विक्रम केला आहे. रोहितने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) विक्रम मोडला आहे. या इनिंगनंतर रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०९ सामन्यांमध्ये एकूण ४७७ षटकार झाले आहेत. तर दुसरीकडे शाहीद आफ्रिदीच्या नावावर ५२४ सामन्यांमध्ये ४७६ षटकारांची नोंद आहे.
ख्रिस गेल अजूनही पहिल्या स्थानावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक षटकार मारणाच्या विक्रम अजूनही युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत ४८३ सामन्यांमध्ये एकूण ५५३ षटकार ठोकले आहेत. पंरतु, रोहित शर्माला आता गेलचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कारण गेल्या काही काळापासून ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक षटकार
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज ) - ५५३
शाहिद आफ्रिदी ( पाकिस्तान ) - ४७६
रोहित शर्मा ( भारत ) - ४७७
ब्रॅंडन मॅक्यूलम (न्यूझीलंड ) - ३९८
मार्टिन गप्तील ( न्यूझीलंड ) - ३७९
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.