Commonwealth Games 2022 : अमित पंघलचा 'गोल्डन' पंच; बॉक्सिंगमध्ये जिंकले सुवर्ण पदक

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकण्याचा धडाकाच उठवला आहे.
Amit Panghal vs Kiaran MacDonald
Amit Panghal vs Kiaran MacDonaldsaam tv
Published On

बर्मिंघम : येथे सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकण्याचा धडाकाच उठवला आहे. भारताने आतापर्यंत १५ सूवर्ण पदकांवर नाव कोरलं असून आज प्रसिद्ध बॉक्सर अमित पंघलने (Amit Panghal) गोल्ड मेडल जिंकलं आहे. अमितने इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा दारुण पराभव केला. अमित पंघलने सामन्यात ५-० ने आघाडी घेत मॅकडोनाल्डला पराभूत केले.

Amit Panghal vs Kiaran MacDonald
Common Wealth Games 2022 : मराठमाेळ्या अविनाश साबळेनं पटकाविलं राैप्यपदक (व्हिडिओ पाहा)

अमितने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळं बॉक्सिंगमध्ये (Boxing) आज भारताला दुसरे गोल्ड मेडल मिळवून दिले. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये अमितला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण यंदा ५१ किलो वजनी गटात पंघलने सूवर्ण कामगिरी केली. त्यामुळे भारताची राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पदकांची लयलूट सुरुच असून एकूण ४२ पदकांची कमाई केली आहे. सामन्याच्या अंतिम फेरीत अमितने मॅकडोनाल्डवर आक्रमक खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com