Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Maharashtra Vidarbha : महाराष्ट्रात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू असून विदर्भातील भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी विज पडून मृत्यू झाले आहेत. या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ
Maharashtra NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात विज पडून दोन ठिकाणी मृत्यू

  • भंडाऱ्यात पशुपालक जागीच ठार, बुलढाण्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

  • दोन महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • हवामान खात्याचा इशारा खरा ठरला; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यासोबत विजांचा कडकडाटही सुरू आहे. अशातच विदर्भातील दोन जिल्ह्यात वीज पडून मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यात गुराखीवर तर बुलढाण्यात ३ शेतकरी महिलांवर वीज कोसळली. दोन वेगवेगळ्या भागात घडलेल्या दुर्घटनांनी संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भंडाऱ्यात नेमकं काय घडलं ?

भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील चपराळ पहाडी परिसरात गुरे व बकऱ्या चराईसाठी गेलेल्या मनोहर कुंभले या ६८ वर्षीय पशुपालकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. सकाळपर्यंत वातावरण शांत असताना दुपारी अचानक ढगांचा गडगडाट, वाऱ्याची झोत आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. या विजेच्या धक्क्याने कुंभले जागीच कोसळले. ग्रामस्थांनी तातडीने मदत केली मात्र त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही.

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील साकोलीचा मुख्य तलाव फुटला, सर्वत्र जलमय परिस्थिती | VIDEO

बुलढाण्यात शेतकरी महिलांवर वीज कोसळली

याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घारोड गावातही अशीच भीषण घटना घडली. शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या तीन महिलांवर गावाच्या नजीक वीज कोसळली. या घटनेत कोकिळा प्रकाश परकाळे या ५४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. कांता दिगंबर परकाळे या ५८ वर्षीय महिला आणि आणखी एका महिलेवर गंभीर दुखापत झाली आहे. विजेचा आघात एवढा प्रचंड होता की कोकिळा परकाळे जागीच कोसळल्या. तर उर्वरित महिलांना ग्रामस्थांनी तत्काळ खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ
Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

एका बाजूला शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची सोय होत असल्याने दिलासा मिळत असला तरी विज पडण्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. या घटनांनंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वीज कडकडत असताना उघड्या जागेत न जाण्याचा, झाडाखाली किंवा वीजवाहिन्यांच्या जवळ आसरा न घेण्याचा आणि तातडीने सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ
Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

रवर्षी विजेच्या तडाख्यातून राज्यात शेकडो लोकांचा मृत्यू होतो आणि अनेक जण जखमी होतात. यामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची तातडीची गरज आहे. अशा दुर्दैवी घटनांनी दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि हवामान खात्याच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन केल्यास अशा दुर्घटनांचे प्रमाण कमी होऊ शकते, असा नागरिकांचा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com