ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांनाच नजर लागण्याची भीती असते.
कोणतेही चांगले काम करत असताना कोणाला सांगितले तर नजर लागून ते काम पूर्ण होत नाही असे मानले जाते.
अचानक आजारी पडलो, कुठे काही अपघात झाला तरी सुद्धा हे नजर लागल्यामुळेच झाले आहे असे म्हटले जाते.
पण नजर लागणे हा एक श्रद्धा-अंधश्रद्धेचा भाग असला तरी त्यामागे एक सायकॉलॉजिकल सत्य दडलेलं आहे.
आपले शरीर ऊर्जा आकर्षित करणाऱ्या चुंबकासारखे असते. आपण जे काही ऐकतो, बोलतो त्यातील चांगली, वाईट ऊर्जा आपले शरीर शोषून घेतं.
शास्रज्ञांच्या मते याला नोसेबो इफेक्ट असे म्हटले जाते.
एखादी व्यक्ती आपल्याबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल नकारात्मकतेने बोलते, तेव्हा आपण त्याच्या बोलण्याचा अतिविचार करू लागतो.
याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण करत असलेल्या कामात लक्ष केंद्रित करता येत नाही आणि कामात अडथळा येतो.
म्हणूनच अंधश्रद्धा न बाळगता मानसिक शांततेसाठी व एकाग्रतेसाठी योग धारणा करा. तसेच तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.