ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आताच्या आधुनिक काळात वाढत्या विकासासह कामांमध्ये आणि कामांच्या वेळेमध्येही वाढ झाली आहे.
अशात अपूर्ण झोप, सतत विचार करणे यामुळे मेंदूवर अधिक ताण पडतो.
यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.
पण ब्रोकोली या सुपरफूडचे सेवन तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी जबरदस्त उपाय ठरेल. चला तर मग जाणून घेऊया.
ब्रोकोली म्हणजे पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये असणारे वनस्पती संयुगे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन के असते. जे मेंदूची रचना, स्मृती आणि आकलनशक्तीसाठी आवश्यक असलेले न्यूरॉन्स टिकवून ठेवण्यास मदत करते.
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तणावाशी लढतात. ज्यामुळे डिमेंशिया आणि अल्झायमर सारखे गंभीर आजार होत नाहीत.
ब्रोकोलीमध्ये आढळणारा सल्फोरेन हा घटक मेंदू डिटॉक्स करण्याचे काम करते. यामुळे मानसिक स्पष्टता मिळते.
तुम्ही ब्रोकोलीचे सेवन सूपमध्ये, वाफवून, तळून, स्मुदीमध्ये किंवा सॅलडच्या स्वरूपात करू शकता.