Dhanshri Shintre
जिओकडे विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनी ग्राहकांसाठी काही खास आणि फायदेशीर ऑफर्ससुद्धा देते.
जिओच्या रिचार्ज लिस्टमधील ८९५ रुपयांचा एक खास प्लॅन ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून त्यात अनेक फायदे दिले जातात.
जिओचा हा किफायतशीर प्लॅन ग्राहकांना तब्बल ३३६ दिवसांची दीर्घ वैधता देतो, त्यामुळे तो अत्यंत फायदेशीर ठरतो.
जिओचा हा प्लॅन ग्राहकांना सुमारे ११ महिन्यांची वैधता देतो, ज्यामध्ये २८ दिवसांच्या १२ चक्रांमध्ये फायदे मिळतात.
जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण २४ जीबी डेटा मिळतो, दर २८ दिवसांसाठी यूजर्सना २ जीबी डेटा उपलब्ध केला जातो.
जिओफोनच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबत ५० एसएमएस दर २८ दिवसांनी मिळतात, ज्यामुळे ग्राहकांना उत्तम कम्युनिकेशन फायदे मिळतात.
यामध्ये ग्राहकांना JioTV आणि JioAICloud सेवा मिळतात, परंतु हा प्लॅन सर्व यूजर्ससाठी उपलब्ध नसल्याचे लक्षात ठेवा.
हा प्लॅन फक्त जिओफोन यूजर्ससाठी आहे; सामान्य स्मार्टफोन वापरकर्त्यांना या योजनेचे फायदे उपलब्ध नाहीत.
सामान्य यूजर्ससाठी १७४८ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे, ज्यामध्ये ३३६ दिवसांसाठी कॉलिंग आणि एसएमएस सुविधा दिल्या जातात.