राज्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने (Maharashtra Rainfall) विश्रांती घेतली आहे. राज्यातील बऱ्याच भागामध्ये सध्या ऊन-पावासाचा खेळ सुरु आहे. चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशामध्ये हवामान खात्याने (Meteorological Department) पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुण्यासह राज्यात म्हणावा तसा पाऊस नाही. यंदा मान्सूनच्या हंगामात ऑगस्टचा दुसरा आठवडा संपला तरी पुणे शहरात फक्त २५७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिवाजीनगर वेधशाळेच्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल ४० टक्के पावसाची घट झाली आहे.
घाटमाथ्यापेक्षाही शहरात वार्याचा वेग सतत कमी असल्याने मोठा पाऊस यंदाच्या पावसाळ्यात झालाच नाही. यंदा पुणे शहरात पाऊस इतक्या धीम्या गतीने झाला आहे. अशामध्ये आता येणाऱ्या ४८ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन व्हायला उशिर झाला. राज्यात ऑक्टोबर मध्यपर्यंत पाऊस राहू शकतो. जुलैमध्ये मान्सून हंगामातील ६० ते ८० टक्के पाऊस पडतो. तो यंदा शहरात पडलाच नाही. त्यामुळे शहरात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. अजून ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण सप्टेंबर महिना बाकी आहे. त्यामुळे ही सरासरी भरून निघेल अशी आशा हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.