संजय राठोड, यवतमाळ
Yavatmal News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची नुकताच बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेच्या निमित्ताने बीडमध्ये शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) बॅनर लावण्यात आले होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) देखील भावनिक बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर चर्चेचा विषय ठरले होते.
याआधीच शरद पवार यांनी माझ्या फोटोंचा वापर केलात तर मी कोर्टात खेचेन असा इशारा दिला होता. तरी देखील अजित पवार गटाकडून वारंवार त्यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. अशामध्ये बीडच्या सभेतून शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी अजित पवार गटावर याच मुद्द्यावरून टीका केली होती. आता याच मुद्द्यावरुन आणि शरद पवारांच्या बीडमधील सभेवर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, शरद पवारांच्या सभेबद्दल मला काही बोलायचं नाही. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबतीत मला बोलायचं नाही.' तसंच, शरद पवारांच्या फोटो वापरण्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'तुमचं दैवत कोण? तुळजा भवानी देवाने देवाच्या मनातून काढले. मात्र भक्तांच्या मनातून देव निघत नाही. त्यांचं सगळं अनुकरण करतोय आम्ही.', असं त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकरी आत्महत्येवर धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 'शेतकरी आत्महत्या ही फक्त यवतमाळ जिल्ह्यात नाही तर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकऱ्यांचा व्यवसाय हा आभाळाखाली आहे. प्रत्येक संकट शेतकऱ्यांना आहे. दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीकविमा दिला. 1500 रुपुये शेतकऱ्यांचे वाचले. नमो शेतकरी सन्मान योजनेमार्फत मदत दिली जाणार आहे.'
मनसे कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या तोडफोड आंदोलनावर धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 'तोडफोड करावी की काय करावं हे ज्याला त्याला अधिकार आहे. मात्र लोकशाही पद्धतीने आपल्याला अधिकार दिलेत. ते त्या पद्धतीने करावे. कायदा हातात घेऊ नये या मताचा मी आहे.', असं त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.