Man Shoot Women in Toilet: Burqa घालून लेडीज टॉयलेटमध्ये घुसायचा आणि व्हिडीओ बनवायचा; पितळ उघड पडताच घडलं भयंकर...

Kerala Kochi News: Burqa घालून लेडीज टॉयलेटमध्ये घुसायचा आणि व्हिडीओ बनवायचा; पितळ उघड पडताच घडलं भयंकर...
Man Shoot Women in Toilet
Man Shoot Women in ToiletSaam Tv
Published On

Kerala Viral Video: केरळचा लुलू मॉल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे बुरखा घातलेला एक तरुण महिलांच्या टॉयलेटमध्ये घुसला. तेथे त्याला मोबाइलने महिलांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करता असताना पकडण्यात आलं आहे.

आरोपीचे वय 23 वर्षे आहे. तो आयटी इंजिनीअर आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याच दिवशी आरोपींविरुद्ध कलम 354 (सी) आणि 419 आयपीसी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Man Shoot Women in Toilet
Post Office Schemes: पोस्ट ऑफिसची धडाकेबाज योजना! महिन्याला 5000 रुपये जमा करा, इतक्या दिवसात मिळणार 8 लाखांहून अधिक रुपये...

या घटनेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, असे कलामासेरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. लुलू मॉलमध्ये बुधवारी ही घटना घडली, असेही पोलिसांनी सांगितले. अभिमन्यू असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोपार्क येथील एका आयटी फर्ममध्ये काम करणारा आरोपी बुरखा घालून महिलांच्या वॉशरूममध्ये घुसला आणि तिथेच मोबाईल ठेवला. त्याने त्याचा फोन एका छोट्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवला. व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी त्याने त्यात एक छिद्र केले आणि तो वॉशरूमच्या दारावर चिकटवला. त्यानंतर तो तेथून निघून गेला. यानंतर तो टॉयलेटच्या बाहेर वाट पाहत उभा होता.

Man Shoot Women in Toilet
Yavatmal News: यवतमाळमधील बीआरएसच्या नेत्याने आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याची दिली धमकी, काय आहे कारण?

त्याचे संशयास्पद वर्तन पाहून मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येथे दाखल होत त्याला ताब्यात घेतलं. पुढे चौकशीत उघड झाले की, तो वॉशरूममधील दृश्ये त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होता. त्यानंतर आरोपीचा बुरखा आणि मोबाइल जप्त करण्यात आला. आरोपीने यापूर्वीही अशी कृत्ये केली आहेत का? याचा पोलीस तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com