Chandrayaan-3
Chandrayaan-3 Saam TV

Moon Photos From Chandrayaan-3 : चांद्रयान-3 ने पाठवले चंद्राचे अगदी जवळचे फोटो, ISROने शेअर केले दोन VIDEO

ISRO Chandrayaan-3 Update : लँडर मॉड्युल डीबूस्टिंग म्हणजेच वेग कमी करुन चंद्राच्या जवळच्या कक्षेत उतरेल.
Published on

Moon Photos By Chandrayaan-3 :

‘चांद्रयान-३’ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. प्रोपल्शन मोड्युलपासून विक्रम लँडर वेगळे करण्याची प्रक्रिया गुरुवारी दुपारी सुरळीत पार पडल्याची माहिती इस्रोने दिली.आता लँडर मॉड्युल डीबूस्टिंग म्हणजेच वेग कमी करुन चंद्राच्या जवळच्या कक्षेत उतरेल.

चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. सगळं सुरळीत पार पडलं तर लँडरला 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार आहे.

Chandrayaan-3
Malaysia Plane Crash Video : मलेशियात चार्टर प्लेन महामार्गावर कोसळलं; १० जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

इस्रोने शुक्रवारी चांद्रयानवरून घेतलेल्या चंद्राचे दोन व्हिडीओही जारी केले आहेत. ISRO ने ट्वीट केली की , चांद्रयान-3 च्या लँडर इमेजर (LI) कॅमेरा-1 ने लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर 17 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राचे फोटो घेतले आहेत. (Latest Marathi News)

Chandrayaan-3
Chandrayaan-3 Mission: ISRO चं मोठं यश; चांद्रयान ३ पासून विक्रम लँडर झाला वेगळा; चंद्राकडे एकटाच निघाला

चांद्रयान 3 पुढचा प्रवास कसा असेल?

लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. या मिशनमध्ये विक्रम लँडरला स्वतः सुमारे 100 किमी अंतर कापायचे आहे. लँडर आता त्याची उंची कमी करत आणि वेग कमी करत चंद्रावर पोहेचणार आहे.

आता लँडरपासून चंद्राचे अंतर 30 किमी ठेवेण्यात येणार आहे. लँडर आता परिभ्रमण करत 90 अंशांच्या कोनातून चंद्राच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सुरुवातीच्या टप्प्यात चांद्रयानाला त्याचा वेग 1.68 किमी प्रतिसेकंद ठेवावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com