Chandrayan 3 Update: चांद्रयान-३ मोहिमेचे (Chandrayaan-3 Mission)मोठे अपडेट समोर आले आहे. आजचा दिवस हा या मोहिमेसाठी खूपच महत्वाचा आहे. चांद्रयान ३ चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहचले आहे. तसंच, प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. आता विक्रम लँडरचा (Vikram Lander) चंद्राच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु झाला आहे. विक्रम लँडर हा यापुढचा प्रवास एकटाच करणार आहे. महत्वाचे म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचण्याची अंतिम तारीखही समोर आली आहे. विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतासाठी खूपच महत्वाचा राहणार आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 च्या चंद्राभोवतीच्या सर्व प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. शेवटची कक्षा 16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली. त्यानंतर इस्रोसाठी आजची दुपार खूपच महत्वाची होती. कारण आज चांद्रयानचे आतापर्यंत प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. चांद्रयान ३ एक एक टप्पा यशस्वीरित्या पार करत चंद्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता चांद्रयानच्या विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेचा अंतिम प्रवास सध्या सुरु झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, 23 ऑगस्ट रोजी फक्त विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. शास्त्रज्ञ टी.व्ही. वेंकटेश्वरन यांनी सांगितले की, रोव्हर लँडरच्या पोटात आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत पृथ्वीवरून लँडर आणि रोव्हरसह प्रवास केला आहे.
आज इस्रो वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. पहिली म्हणजे लँडर मॉड्यूलचे इंजिन आणि इतर गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत. वेगळे झाल्यानंतर लँडर त्याच्या पायावर उभा राहील म्हणजेच त्याची पूर्ण क्षमता आहे. दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे लँडर वेगळे झाल्यानंतर ते आता 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.
दरम्यान, जी प्रक्रिया आता घडत आहेत किंवा घडणार आहेत. ती चांद्रयान-2 दरम्यान देखील यशस्वीरित्या पार पडली होती. त्यावेळीही लँडर वेगळे होऊन चंद्राच्या दिशेने निघाले होते. पण २.१ किमीचे अंतर बाकी होते. त्यानंतर वेग नियंत्रित करता आला नाही आणि क्रॅश लँडिंग करण्यात आले होते. पण आता चांद्रयान ३ मोहिम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोकडून व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.