Maharashtra Rain Dam Water Storage:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Water Storage: वरुणराजा पावला! राज्यातील अनेक धरणं काठोकाठ भरली; कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या...

Maharashtra Rain Dam Water Storage: गेल्या दोन आठवड्यांपासून होणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यातील सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. सध्या राज्यातील 2 हजार 997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, ता. ६ ऑगस्ट २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह रायगड, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व धरणे भरली असून राज्यातील 2 हजार 997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे.

राज्यात यंदा वरुणराजाची कृपा!

गेल्या दोन आठवड्यांपासून होणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यातील सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. सध्या राज्यातील 2 हजार 997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे, तर राज्यातील एकूण ३४ धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरण 100 टक्के भरले आहे. उजनीतील विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सर्व धरणे भरली

दुसरीकडे कोयना धरणामध्ये सद्यःस्थितीत ८१.८१ टक्के इतका पाणीसाठा आहे. कोकणातील धामणी, तिल्लारी, बारवी, मोडकसागर ही धरणेही भरली आहेत. त्यामुळे उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी, कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे.

पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण ९० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर मिळून 26.34 टीएमसी पाणीसाठा तयार झाला असून खडकवासला धरण, ६०.२६ टक्के, पानशेत धरण ९१.७५ टक्के, वरसगाव धरण ९१.०३ टक्के, टेमघर धरण १०० टक्के भरले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT