Ujani Dam: आनंदाची बातमी, 4 जिल्ह्यांची तहान भागवणारे उजनी धरण १०० टक्के भरले!

Ujani Dam 100 % Water Level : उजनी धरणात सध्या दोन लाख पाच हजार विसर्गने पाणी येत असून धरणातून भीमा नदीत एक लाख क्युसेक विसर्ग केला जातोय. सध्या धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
Ujani Dam: सोलापूर-नगरकरांची चिंता मिटली, उजनी १०० टक्के भरले, पाहा VIDEO
Ujani Dam: उजनी धरण 100 टक्के भरलं; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण; पाहा VideoSaam TV
Published On

Ujani Dam Water Level : पुणे, सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण १०० टक्के भरले आहे. पुणे जिल्हाच्या (Pune Rain) पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के (Ujani Dam 100 % Water Level) भरले आहे. उजनी धरणात सध्या दोन लाख पाच हजार विसर्गने पाणी येत असून धरणातून भीमा नदीत एक लाख क्युसेक विसर्ग केला जातोय. सध्या धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

उजनी धरणाच्या (Ujani Dam) वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उजनी धरण आता ओव्हरफ्लो (ujani dam overflow today) होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये उजनी धरण मायनसमध्ये गेले होते. पण यंदा घाट माथ्यावर चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण काठोकाठ भरले आहे.

भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग -

उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे पुरनियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे. 20000 क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 95202 क्युसेकने आवक होत आहे. उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रभागा नदीला पूर, पंढरपूरला पुराचा धोका -

पंढरपूरमध्ये भीमा नदी इशारा पातळीपासून अवघ्या चार मीटर दूर आहे. त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे, आज दुपारनंतर पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

आज सकाळी उजनी धरणातून 80 हजार क्युसेक पाणी तर वीर 60 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. सध्या तभीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.

सध्या पंढरपुरात चंद्रभागा 30 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह घेऊन वाहत आहे. दुपारनंतर हा विसर्ग वाढणार आहे. सध्या 439 मीटर पातळीने भीमा नदी आहे. इशारा पातळी 443 मीटर आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागाला पुराचा धोका बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com