congress mlas jitesh antapurkar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: लवकरच भूमिका स्पष्ट करणार, शिंदे गटात जाण्याबाबतच्या चर्चेवर जितेश अंतापूरकरांची पहिली प्रतिक्रिया

Congress Mlas Jitesh Antapurkar: जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जितेश अंतापुरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आमदार जितेश अंतापूरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Priya More

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर विधानपरिषद निवडणुकिमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप करण्यात आला आहे. तर त्यानंतर भाजप नेते उपाध्याय आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे अंतापूरकर चर्चेत आले होते. अशामध्ये जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जितेश अंतापुरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आमदार जितेश अंतापूरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

जितेश अंतापूरकर यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री शिंदे यांची भेट ही मतदारसंघातील विविध विकास कामाविषयी घेतली होती. एक लोकप्रतिनिधी म्हणून विविध नेत्यांना भेटावे लागते. मी काँग्रेस पक्षातच आहे. तब्बेत खराब असल्यामुळे काँग्रेसच्या विभागीय बैठकीला गैरहजर होतो. तसं आमच्या वरिष्ठांना मी कळवलं देखील आहे. काँग्रेसच्या काही लोकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. ते मला चुकीचं वाटतंय. माझ्याबद्दल काँग्रेस पक्षातील सुद्धा कुणी काही सांगितलं म्हणून अपप्रचार करणे याचा ही मला खेद वाटतोय.

'काल मी मुंबई येथे काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली असून मी माझी भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी काँग्रेस पक्षाकडूनच लढवणार आहे.', असे आमदार जितेश अंतापूरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देत शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. अशामध्ये अंतापूरकर हे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार आहे हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकारी आणि आमदारांच्या पक्षांतरांना वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. अशामध्ये मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांचे फोटो देखील समोर आले होते. यावरूनच हे दोघेही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT