अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार घराण्यातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिलाय. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील 'पवार विरूद्ध पवार' सामना होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. बारामतीमधून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. यावर आता अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
अजित पवार काय म्हणाले ?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्यामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे जनतेचा कल कसा आहे, ते बघुया. जय पवार यांना उभं करणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी बारामतीमधील कार्यकर्ते, बोर्ड जे निर्णय घेतील ते बघू असं उत्तर दिलंय. जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, उमेदवारी द्यायला पाहिजे हे जनता ठरवेल. आमच्या जनतेचा आणि त्या भागातील काही कार्यकर्ते जी मागणी करतील, ते करायला तयार आहे. मी सात-आठ वेळा लढलो आहे. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट (Maharashtra Politics) नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे. यावरून अजित पवार यांनी ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
जय पवार यांना उमेदवारी दिली जाणार का?
अजित पवार यांच्या कुटुंबातला चौथा सदस्य आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे संकेत मिळत आहेत. बारामती विधानसभेतून जय पवार यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यावर अजित पवार यांनी देखील सकारात्मक उत्तर दिल्याचं समोर (Baramati Vidhan Sabha Election) आलंय. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झालीय. उमेदवारांची देखील घोषणा होत आहे. त्यामुळे आता बारामतीतून जय पवार यांना उमेदवारी दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महायुती बारामती विधानसभेत कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार?
अजित पवार गटाकडून बारामतीमधून जय पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्याकडून तसे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची (Jai Pawar Vs Yugendra Pawar) चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बारमतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होणार का? याबाबत राज्यात चर्चा सुरु झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.