Maharashtra Politics: काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? खोसकर, अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Jitesh Antapurkar and Hiraman Khoskar Meet CM Shinde: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत....काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय.
काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? खोसकर, अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Jitesh Antapurkar and Hiraman Khoskar Meet CM ShindeSaam Tv
Published On

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना ज्या आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे त्यांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. .काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि देगलूरचे जितेश अंतापूरकरांनी वर्षावर जाऊन शिंदेंची भेट घेतली.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात प्रामुख्यानं जितेश अंतापुरकर आणि हिरामण खोसकरांच्या नावाचा समावेश होता. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर या दोघांवर कारावईचीही शक्यता आहे. त्यामुळेच हे दोघे पक्षांतराची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकरांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घेऊ...

काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? खोसकर, अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Vinesh Phogat: शेवटची आशाही मावळली! विनेश फोगाटला पदक मिळणार नाही, CAS ने फेटाळली याचिका

जितेश अंतापूरकर

जितेश अंतापूरकर वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत नांदेडच्या देगलूरमधून विधानसभेवर निवडणून आले. अंतापूरकर हे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं. त्यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप देखील आहे.

हिरामण खोसकर

हिरामण खोसकर हे 2019 मध्ये इगतपुरीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणून आले. ते नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. आदिवासी बहुल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करतात. त्यांच्यावरही विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे.

काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? खोसकर, अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Pune News: पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, ड्रग्सचे सेवन करणारे ते '११९' जणं पोलिसांच्या रडारवर

लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झालीय. मात्र तरीही काँग्रेस आमदार पक्षांतराच्या तयारीत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेचं श्रेय घेण्यात सर्वात आघाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच की काय काँग्रेस आमदारांनाही शिंदेंची भुरळ पडली असून ते हाती धनुष्य घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com