Sunil Tatkare On Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sunil Tatkare Video: रोहित पवार भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते, सुनिल तटकरे यांचा शिर्डीत मोठा दावा

Priya More

सचिन बनसोडे, अहमदनगर

'रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते', असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी भाजपकडून (BJP) विधानसभेचे तिकीट मागितले होते असे वक्तव्य सुनिल तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर असलेल्या सुनिल तटकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. सुनिल तटकरे यांचा दोन दिवसांचा अहमदनगर जिल्हा दौरा आहे. सुनिल तटकरे यांच्यासोबत रुपाली चाकणकर या देखील अहमदनगर दौऱ्यावर आहेत.

रोहित पवार भाजपच्या वाटेवर होते -

सुनिल तटकरे यांनी सांगितले, 'इकडच्या आमदारांची नसले, पण अनेकदा त्यांचा आग्रह राहिला भाजपसोबत आपण गेले पाहिजे. त्यांनी तर २०१९ मध्ये भाजपकडे उमेदवारीच मागितली होती. कोणाला नैतिकता, कोणाला काय म्हणण्याचा अधिकार त्याठिकाणी आहे. त्याच्यानंतर सरकारमध्ये घेतलं गेलं नाही म्हणून पुन्हा एकदा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर लढवण्याबाबत मत त्यांनी काही वेळा व्यक्त केले होते' सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

सुनिल तटकरेंचा महाविकास आघाडीला टोला -

अहमदनगर दौऱ्यादरम्यान सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'नाना पटोले 150 जागा म्हणतात. राष्ट्रवादीचे काही नेते 100 म्हणतात आणि शिवसेना 288 म्हणते. विधानसभेच्या जागा 500 च्या वर झाल्या का? हे मला माहीत नाही.', असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. तसंच, 'महायुतीत अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा नाही. येत्या 15 दिवसांत जागा वाटप धोरण निश्चित होईल. आमच्या आज असलेल्या जागांचा बेस धरुनच पुढील चर्चा केली जाईल.'

अमोल मिटकरींनी माहिती घेऊनच बोलावे -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी मोठे वक्तव्य केले होते. अजित पवार यांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'भाजप अजित पवारांना टार्गेट करत नाही. काही हितशत्रू जाणीवपूर्वक अशा बातम्या प्रसारित करताय. महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य केले जातात. अमोल मिटकरी यांनी माहिती घेऊनच कोणत्याही विषयी बोलले पाहिजे अशी माझी त्यांना सूचना आहे.'

भुजबळसाहेब परिवाराचे ज्येष्ठ घटक -

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुनिल तटकरे यांनी सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आणि या परिवाराचे अजितदादा प्रमुख आहेत. भुजबळसाहेब देखील या परिवाराचे ज्येष्ठ घटक आहेत. त्यांच्या विधानाचा अलीकडचा आणि पलीकडचा भाग मी पाहत नाही तोपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. पक्ष चालवताना अध्यक्ष नेतृत्व करतात हे भुजबळांना देखील मान्य आहे. भुजबळ आमच्या नेत्यांसोबत आणि पक्षासोबत आहेत. भुजबळांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुका लढवल्या जातील.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT