Laxman Hake VIDEO : लक्ष्मण हाकेंची प्रकृती आणखी खालवली; ब्लडप्रेशर वाढलं, हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका

OBC Reservation News : ब्लडप्रेशर वाढत असल्याने लक्ष्मण हाके यांना हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका उद्भवू शकतो, अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे.
OBC Reservation News
Laxman Hake Health UpdateSaam TV

अक्षय शिंदे

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. अशात उपोषणामुळे लक्ष्मण हाकेंची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हाकेंचं ब्लडप्रेशर वाढत आहे. अशात डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक शक्यता वर्तवली आहे.

OBC Reservation News
Manoj Jarange On Reservation: आरक्षणावरुन मनोज जरांगेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

ब्लडप्रेशर वाढत असल्याने लक्ष्मण हाके यांना हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका उद्भवू शकतो, अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणं आहे. जवळपास 178 हाय ब्लडप्रेशर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.

सकल ओबीसी समाजाकडून आज अंबड शहर बंदची हाक

एकीकडे लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक असताना दुसरीकडे जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी संघटनांकडून काल धुळे- सोलापूर महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान ओबीसी आंदोलकांची दखल घेतली जात नाही असा आरोप करत आज ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली आहे.

ओबीसी आरक्षणाची ठिणगी हिंगोलीतही पेटली

थोड्याच वेळात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी हिंगोलीतून 200 गाड्यांचा ताफा वडी गोद्री गावाकडे निघणार आहे.

धुळे- सोलापूर महामार्गवर रास्ता रोको

दरम्यान आज ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिलीये. तसेच धुळे- सोलापूर महामार्गवर रास्ता रोको करण्यात येत आहे.

OBC Reservation News
Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com