Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट

Chhagan Bhujbal Meets Laxman Hake: छगन भुजबळ जालना जिल्ह्यातील आंदोलन स्थळी जाऊन हाके यांची भेट घेणार आहेत. लक्ष्मण हाके यांचा ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्या मागणीला भुजबळांनीही पाठिंबा दिला आहे.
Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा;  आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट
Chhagan Bhujbal Saam TV

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशात आता राष्ट्रवादी अजित पवार गटतील मंत्री छगन भुजबळ लवकरच ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळालीये. येत्या दोन दिवसात म्हणजे उपोषणाच्या सहाव्या दिवशी ही भेट होणार आहे.

Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा;  आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट
Laxman Hake On Jarange Patil News | लक्ष्मण हाके यांचं जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत छगन भुजबळ जालना जिल्ह्यातील आंदोलन स्थळी जाऊन हाके यांची भेट घेणार आहेत. लक्ष्मण हाके यांचा ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्या मागणीला भुजबळांनीही पाठिंबा दिला आहे.

सोमवारी छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भुजबळ आंदोलकांची भेट घेणार आहेत.

छगन भुजबळ हे कोणताही वेगळा विचार करणार नाही - सुनील तटकरे

एकीकडे आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या पक्षातून डावललं जात आहे, अशी चर्चा रंगलीये. तसेच भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या विचाराबाबत चर्चा होऊन त्याचे निराकरण झाले आहे. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितले.

तसेच काल झालेल्या समता परिषदेमध्ये ओबीसी आरक्षण आणि जातीय जनगणना याबाबत चर्चा करण्यासाठी घेतली होती अशी माहिती असून, छगन भुजबळ हे कोणताही वेगळा विचार करणार? अशा चर्चा फक्त अफवा आहेत, असेही सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

Chhagan Bhujbal on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळांचा पाठिंबा;  आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट
Laxman Hake Hunger Strike: 'मनोज जरांगेंना रेडकार्पेट अन् आमच्या उपोषणाची दखलही नाही', ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी खदखद मांडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com