Political News
Nashik ConstituencySaam TV

Nashik Constituency : नाशिकच्या जागेवरून महायुतीत धुसफूस; शिंदेंचे उमेदवार पाडणार : समता परिषदेची आक्रमक भूमिका

Political News : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे एकाच समाजाचे असल्यासारखे वागत असून ओबीसींवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे, असा आरोप समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष यांनी केलाय.
Published on

विनोद जिरे

नाशिक लोकसभेच्या जागेवरून आता महायुतीत धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीमधून छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागल्याने समता परिषद आक्रमक झाली आहे. बीडमध्ये समता परिषदेने काळ्याफिती लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निषेध व्यक्त केला आहे.

Political News
Madha Lok Sabha : ३० वर्षांनंतर कट्टर विरोधक जानकर-मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर; माढ्यात महायुतीला मोठा धक्का

दरम्यान, आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार पाडणार आहोत. अशी भूमिका समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी स्पष्ट केलीय. यावेळी सुभाष राऊत म्हणाले की, छगन भुजबळ यांच्या पाठीशी तमाम ओबीसी समाज उभा राहिला आहे. नेमके हेच काही नेत्यांच्या डोळ्यात खूपत असून त्यांना रोखण्यासाठीच त्यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होऊ दिली गेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे एकाच समाजाचे असल्यासारखे वागत असून ओबीसींवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे, असा आरोप समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष यांनी केलाय. आता आम्ही एकनाथ शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पाडणार असल्याची आक्रमक भूमिका देखील समता परिषदेच्या वतीने त्यांनी जाहीर केली आहे.

छगन भुजबळांची भूमिका

नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढविणार असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

की मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवलं होतं. त्यांनी दाखविलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो, असं भुजबळ म्हणाले.

Political News
Nashik Lok Sabha 2024: मला बिनविरोध निवडून द्या, शांतीगिरी महाराज हट्टाला पेटले; नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com