Nashik Lok Sabha 2024: मला बिनविरोध निवडून द्या, शांतीगिरी महाराज हट्टाला पेटले; नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय?

Nashik Lok Sabha Latest Update: नाशिक मतदारसंघातून जनतेते आतापर्यंत विविध १७ खासदार निवडून दिले आहेत. त्यामुळे यंदा राजकीय पक्ष आणि मतदारांनी माझ्या नावाचा विचार करावा, असं देखील शांतीगिरी महाराज यांनी म्हटलं आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency Saam TV
Published On

Nashik Lok Sabha Constituency 

नाशिक लोकसभा मतदारसंघातून मला बिनविरोध निवडून द्या, अशी मागणी शांतीगिरी महाराज यांनी सोशल मीडियावरुन केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा. ही निवडणूक बिनविरोध कशी होईल, यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन देखील शांतीगिरी महाराज यांनी केलं आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Nagpur Constituency : मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये बिघाड; नागपूरच्या दिघोरीमधील घटना

आतापर्यंत नाशिक मतदारसंघातून जनतेते विविध १७ खासदार निवडून दिले आहेत. त्यामुळे यंदा राजकीय पक्ष आणि मतदारांनी माझ्या नावाचा विचार करावा, असं देखील शांतीगिरी महाराज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) नेमकं काय होणार? याकडे मतदारांचं लक्ष लागून आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी शांतीगिरी महाराजांकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरु आहे. यासाठी त्यांनी एक स्वतंत्र टीम कार्यरत केली आहे. या टीममध्ये विविध युवक काम करीत असून काही राजकीय सल्लागार देखील आहेत.

या समितीच्या सूचनेनुसार शांतीगिरी महाराज प्रचार करत असून आपल्या भक्तांसह मतदारांना दररोज एक संदेश देत आहेत. भक्तांनी स्वखर्चाने त्यांचा प्रचार करावा. स्वतःचे वाहन घेऊन मतदारांच्या गाठीभेटी कराव्यात, असे आवाहन शांतीगिरी महाराज यांनी केलं आहे. त्यांचे हे उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024 Latest News)

नाशिक लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी यंदा विविध धार्मिक नेते मैदानात उतरले आहेत. यापूर्वी स्वामी कंठानंद यांनी देखील लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. भाजपने आपल्याला निवडणुकीचं तिकीट द्यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश देखील केला. शांतीगिरी महाराज यांनी देखील भाजप, शिवसेना ठाकरे गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि मनसे या पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली.

दुसरीकडे नाशिकच्या जागेवरुन सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता शांतीगिरी महाराज यांनी राजकीय पक्षांना आवाहन करून बिनविरोध निवडणुकीसाठी स्वतःचे नाव रेटले आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न राजकीय नेते कितपत गांभीर्याने घेतात याची चर्चा सुरू झाली आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Madha Lok Sabha 2024: माढ्यात महायुतीला धक्क्यावर धक्के; शिंदे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com