Madha Lok Sabha 2024
Madha Lok Sabha 2024 Saam TV

Madha Lok Sabha 2024: माढ्यात महायुतीला धक्क्यावर धक्के; शिंदे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

Lok Sabha Election 2024: मोहिते पाटील आणि नारायण आबा पाटील यांच्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे करमाळ्याचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Madha Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना माढ्यात महायुतीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. मोहिते पाटील आणि नारायण आबा पाटील यांच्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे करमाळ्याचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Breaking Marathi News)

Madha Lok Sabha 2024
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे खुद्दार, उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केलाय; आशिष शेलार यांची टीका

देवानंद बागल हे माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अचानक शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने माढ्यात भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील शिवसेनेचा (शिंदे गटाच्या) राजीनामा दिला.

या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची चांगलीच ताकद वाढली. सलग दोन धक्के बसल्यानंतर आता माढ्यात महायुतीला तिसरा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाचे करमाळ्याचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

देवानंद बागल हे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. करमाळ्यात त्यांची मोठी ताकद आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांनी निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहितेंना उतरवले आहे.

Madha Lok Sabha 2024
Praniti Shinde Wealth : प्रणिती शिंदेंच्या नावे साडेसहा कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com