विश्वभूषण लिमये
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. अशात राज्यातील अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत. उमेदवारी अर्ज दाखल करताना तिथे आपल्याकडे असलेल्या संपत्तीची देखील माहिती दिली जाते. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या संपत्तीची चर्चा होताना दिसतेय.
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या ६ कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे. २०१९च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत ५ वर्षांत १ कोटी ८१ लाख ४२ हजार १९२ रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे २०१९ मध्ये ४ कोटी ७९ लाख २७ हजार २१० रुपयांची मालमत्ता होती. तर २०२४ मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता,संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.
विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी,चारचाकी नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. २०१९च्या तुलनेत त्यांची बँकांमधील ठेवी तथा रक्कम जवळपास ३० लाख रुपयांनी कमी झाली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे दिसून येते.
निवासस्थाने : दादर आणि सोलापूर (प्रत्येकी एक)
जमीन : ५ एकर ७० गुंठे
वाहने व वैयक्तिक कर्ज : नाही
दागिने : ३०० ग्रॅम
बँका - टपालमधील ठेवी ९९.५१ लाख रुपये
शेअरमधील गुंतवणूक : जवळपास १२ लाख रु.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.