Narhari Zirwal : अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर? शरद पवारांचं कौतुक करत झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

Narhari Zirwal News : अजित पवार गटातील नेते पुन्हा एकाद परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. या चर्चांवर आमदार नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Narhari Zirwal News
Narhari Zirwalsaam tv
Published On

दादांची (अजित पवार) कामकाजाची पद्धत वेगळी आहे. साहेबांचंही (शरद पवार) काम मोठं आहे, साहेबांनी आत्तापर्यंत केलं ते दुसरं कोणी करणारही नाही, अशा शब्दांत आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उत्तर दिलं आहे.

Narhari Zirwal News
Narhari Zirwal Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

संघाचे मुखपत्र आणि काल झालेल्या भाजप आणि संघाच्या बैठकीत लोकसभेच्या निकालात कमी मतं मिळाल्याचं खापर अजित पवार गटावर फोडण्यात आलं आहे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात अजित पवार गट संघ-भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर असल्याचं दिसत आहे. या सर्वांमुळे अजित पवार गटातील नेते पुन्हा एकाद परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. या चर्चांवर आमदार नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलीये.

कोण कोणत्या वाटेवर आहे हे समजायला मार्ग नाही. पण असं होणार नाही. दादांची कामकाजाची पद्धत वेगळी आहे. साहेबांचंही (शरद पवार) काम मोठं आहे, साहेबांनी आत्तापर्यंत केलं ते दुसरं कोणी करणारही नाही. साहेबांसारखं काम भविष्यातही कोणी करणार नाही, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, " साहेबांसारखं काम भविष्यातही कोणी करणार नाही, असं असलं तरी युवा नेतृत्व म्हणून अजित दादांकडे पाहिलं जातं त्यामुळे आमदार जाणार नाहीत, असं ठामपणे झिरवळांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

Narhari Zirwal News
Narhari Zirwal News: नरहरी झिरवळांनी असं काय म्हटलं की Sharad Pawar देखील खळखळून हसले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com