Shivsena MLA Disqualification Result Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेच्या निकालाचे तीव्र पडसाद.. शिंदे गटाचा जल्लोष, ठाकरे गट उतरला रस्त्यावर; राज्यभरात काय घडतंय?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: सत्ता संघर्षाच्या निकालाचे शिंदे गटाकडून जल्लोष करत स्वागत केले जात असतानाच ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांचा निषेध केला जात आहे. पालघरमध्ये शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने आल्याची बातमी समोर आली आहे.

Gangappa Pujari

Shivsena MLA Disqualification Result:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सत्ता संघर्षाच्या निकाल देताना शिंदे गट हा मुळ शिवसेना पक्ष असल्याचे म्हटले आहे. या निकालानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गटाकडून जल्लोष करत स्वागत केले जात असतानाच ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांचा निषेध केला जात आहे. अशातच पालघरमध्ये शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने आल्याची बातमी समोर आली आहे.

पालघरमध्ये शिंदे- ठाकरे गट आमने सामने..

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पालघरच्या हुतात्मा चौकात जल्लोष केला गेला. त्याचवेळी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) विरोधात काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. यावेळी दोन्ही गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील या संघर्षामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रायगडमध्ये ठाकरे गट आक्रमक...

दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कालच्या निर्णयाने देशाच्या लोकशाहीची हत्या झाल्याचं ठाकरे गटाचे म्हणणे आहे. या निर्णयानंतर रायगडमध्ये (Raigad) ठाकरे गट आक्रमक झाला असून नार्वेकर यांच्या फोटोवर फुली मारीत, काळे झेंडे दाखवत आणि जोरदार घोषणाबाजी करीत केला निषेध व्यक्त केला.

वाशिमध्ये नार्वेकरांविरोधात आंदोलन...

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वाशिमच्या (Washim) पाटणी चौकात विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत नार्वेकर यांच्या प्रतिमेला शाई फासत जोडे मारून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून या निकालाचा निषेध केला.

वर्धेच्या बजाज चौकात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन..

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर वर्ध्यामध्येही ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. निहाल पांडे यांच्या नेतृत्वात नार्वेकरांविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात निकाल 'काहीही लागो गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही' अशा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार घोषणाबाजी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT