आजकाल खाण्यापिण्याच्या गोष्टींवरून वाद होणं ही अगदी सामान्य गोष्ट झालीय. अनेकदा ग्राहक आणि दुकानदारांमध्ये गंभीर वाद झाल्याचं देखील समोर येतंय. अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीच्या फरश बाजारातून समोर आलीय. दिल्लीतील फरश बाजारात दुकानदारानं ग्राहकाला चाकून भोसकल्याची घटना घडली आहे. ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (latest crime news) मोमोज खाणं सुद्धा महागात पडू शकतं, हे दिल्लीतून समोर आलंय. नक्की काय घटना घडली ते आपण जाणून घेवू या.
मोमोज (momos) खाताना चटणी मागणं पडलं महागात
दिल्लीतील भीकम सिंग कॉलनी परिसरात मोमोज खाताना अधिक चटणी (Momos Chutney) मागितल्याच्या कारणावरून दुकानदारानं ग्राहकावर चाकूनं हल्ला केलाय. हल्ल्यात ग्राहकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. ही घटना फरश बाजार परिसरातील भीकम सिंग कॉलनीतून उघडकीस आलीय. हा परिसर बहुतांशी गजबजलेला आहे. जमावासमोरच ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नक्की काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक भीकम सिंग कॉलनी परिसरात मोमोज खाण्यासाठी गेला होता. तेव्हा मोमोज कॉर्नरचा मालक आणि ग्राहक यांच्यात वाद (Momos Chutney) झालाय. यावेळी ग्राहकाने मोमोज खाण्यासाठी अधिक चटणी मागितली होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जावून त्यांच्यात हाणामारी झाली. दुकान मालकानं ग्राहकावर चाकूने हल्ला (knife attack) केलाय.
ग्राहकाला गंभीर दुखापत
या घटनेत ग्राहकाला गंभीर दुखापत झालीय. त्याला दिल्लीतील GTV रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला. इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे आणि रस्त्यावर रक्ताचे थेंब दिसल्याच्या जागेवर चिन्हांकित केलं आहे. परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोमोज स्टॉलवर ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी (delhi) या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.
पुण्यातील घटना
पुण्यात देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. पार्टी साजरी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून ग्राहकानं चिकन दुकानदाराला चाकूनं भोकसल्याची घटना घडली होती. या घटनेत चिकन दुकानदार गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद अगदी शिगेला पोहोचतात. त्यामधूमन मग मारहाण, खून झाल्याच्या घटना घडत (crime) आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.