Wardha News: न्यायालयाने जामीन दिला धाकट्याला, कारागृहाकडून सुटका थोरल्याची; वर्धा कारागृहाचा अजब कारभार

Wardha News In Marathi : . दोघांपैकी धाकट्या भावाचा न्यायालयातून जामीन मंजूर झाला. हमदस्त कारागृहात पोहचला. मग काय, जिल्हा कारागृह प्रशासनाने कुठलीही शाहनिशा न करता चक्क थोरल्या भावाचीच सुटका केली.
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

Wardha News in Marathi :

वर्धेच्या कारला चौकातील पेट्रोलपंपावरील तोडफोड करुन हॉटेलात सशस्त्र हल्ला केल्या प्रकरणात दोन भावंडे कारागृहात बंदिस्त होते. दोघांपैकी धाकट्या भावाचा न्यायालयातून जामीन मंजूर झाला. हमदस्त कारागृहात पोहचला. मग काय, जिल्हा कारागृह प्रशासनाने कुठलीही शाहनिशा न करता चक्क थोरल्या भावाचीच सुटका केली. चूक लक्षात येताच खळबळ उडाली. धावाधव करुन पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. (Latest Marathi News)

रामनगर पोलिसांनी चुकीने सुटका झालेल्या थोरल्याची धरपकड करुन परत कारागृहात डांबले. त्यानंतरच कारागृह प्रशासनाने जामीन मंजूर झालेल्या धाकट्या भावाची सुटका केली. या घटनेमूळे कारागृह प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला नसला तरी रामनगर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Kalyan Crime News: दारूपार्टी रंगात असतानाच झाला वाद, मित्राने मित्राचीच गोळ्या झाडून केली हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीसार, २६ जून २०२२ रोजी वर्धा शहरातील कारला चौकात असलेल्या पेट्रोलपंपासह एका हॉटेलावर सशस्त्र हल्ला चढवून रक्कम लूटली होती.या प्रकरणात रामनगर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून सर्व आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयाने रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग लखनसिंग जुनी याला जामीन मंजूर केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जामीन मंजूर झाल्यानंतर वकिलामार्फत हमदस्त कारागृहात पोहचला. कारागृह प्रशासनाकडून कालू जूनी याची सुटका करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, हे सर्व करीत असतानाच कारागृह प्रशासनाने रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग जुनी याची सुटका न करता अटकेत असलेला त्याचा मोठा भाऊ राजेंद्रसिंग उर्फ गुड्डूसिंग लखनसिंग जुनी याची कुठलीही शाहनिशा न करता सुटका केली. काही वेळानंतर हा गंभीर चूक कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी थेट रामनगर पोलिसांशी संपर्क करुन घडलेला प्रकार सांगितला.

Wardha News
Mumbai Crime: अंधेरी परिसरात नायजेरियन पेडलरला अटक; १.२५ कोटी रुपयांचं अमली पदार्थ जप्त

रामनगर पोलिसांनी लगेच आरोपी गुड्डूसिंग जुनी यास परत अटक करुन कारागृहात डांबले. त्यानंतरच रवींद्रसिंग उर्फ कालूसिंग जुनी याची सुटका करण्याची प्रक्रिया पार पडली. या घटनेने कारागृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला नाही. मात्र पोलीस प्रशासनात या घटनेबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com