Maharashtra Politics: आमदार अपात्रतेच्या निकालानंतर दुसरा धक्का; उद्धव ठाकरेंच्या हातातून 'मशाल' चिन्हही जाणार?

Samata Party Claims on Mashal Symbol: समता पक्ष आता मशाल चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे. तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केला आहे.
Shivsena Uddhav Thackeray Groups Mashal Symbol
Shivsena Uddhav Thackeray Groups Mashal Symbol Saam TV
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ११ जानेवारी २०२४

Maharashtra Politics News:

बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

समता पक्षाचा मशाल चिन्हावर दावा..

शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं दिलं होते. मात्र आता मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाकडे अर्ज

४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. आजपासून (११ जानेवारी २०२४) ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे. तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena Uddhav Thackeray Groups Mashal Symbol
Collector Kumar Ashirwad : अत्यावश्यक सेवेच्या वाहनाची अडवणुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा

दरम्यान, याआधीही समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पक्षाने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. त्यामुळे आता ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार? समता पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Shivsena Uddhav Thackeray Groups Mashal Symbol
Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com