Collector Kumar Ashirwad : अत्यावश्यक सेवेच्या वाहनाची अडवणुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा

Solapur News : हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केला. मात्र या कायद्याची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू आहे.
Collector Kumar Ashirwad
Collector Kumar AshirwadSaam tv
Published On

सोलापूर : हिट अँड रन या कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात आंदोलन केले जात आहे. ट्रक चालकांकडून गाड्यांची (Solapur) अडवणूक केली जात आहे. मात्र अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल; असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला. (Tajya Batmya)

Collector Kumar Ashirwad
Beed News : खड्यात बांधलेल्या बैलजोडीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केला. मात्र या कायद्याची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू आहे. सोलापूरमधील एलपीजी, डिझेल, पेट्रोलचा (Petrol) पुरवठा करणाऱ्या वाहनाची, ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याचे निर्देशनास आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Collector Kumar Ashirwad
Climate Change : रात्री थंडी- दुपारी ऊन; वातावरण बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

संपर्क करण्याचे आवाहन 
सद्यस्थितीत केंद्र शासनाने हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये; अशी अडवणूक करणाऱ्या संबंधितावर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स, ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल, पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com