Climate Change
Climate ChangeSaam tv

Climate Change : रात्री थंडी- दुपारी ऊन; वातावरण बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

Beed News : पावसाळा संपल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात थंडी जाणवली नाही. त्यानंतर काही दिवसांनी थंडीची लाट आली. तर मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

बीड : सकाळी, रात्री थंडी तर दुपारी ऊन पडत आहे.  बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. याचाच परिणाम म्हणून लहानांपासून वृद्धांपर्यंत व्यक्तींना सर्दी, ताप आणि खोकला यासारखे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे (Beed) जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्ण संख्या वाढली आहे. (Maharashtra News)

Climate Change
Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

पावसाळा संपल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात थंडी जाणवली नाही. त्यानंतर काही दिवसांनी थंडीची लाट आली. तर मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. घरोघरी सर्दी, खोकला सारख्या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. त्यामुळं जिल्हा रुग्णालयासह (Hospital) उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Climate Change
Beed News : खड्यात बांधलेल्या बैलजोडीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

आरोग्य विभागाचे आवाहन 

सतत बदलत असलेल्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उकळून पाणी प्यावे, वाफ घ्यावी असं आवाहन आरोग्य विभाकडून केलं जात आहे. तसेच जास्त त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com