Rabi Crops : हरभरा पीकावर रोगराई; ढगाळ वातावरण, धुके आणि गारठ्याचा परिणाम

Beed News : परतीच्या झालेल्या पावसावर रब्बी हंगामातील पेरणीस उशीर झाला होता. रबीच्या पेरणीत ज्वारी, गहू पिकासह सर्वाधीक हरभरा बियाण्याची पेरणी झाली आहे.
Rabi Crops
Rabi CropsSaam tv
Published On

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण, धुके आणि गारठा वाढला आहे. (Beed) अशा बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हरभरा पिकावर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Tajya Batmya)

Rabi Crops
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत पहाटे स्फोट; ३ कामगार जखमी, परिसरातही बसले हादरे

परतीच्या झालेल्या पावसावर रब्बी हंगामातील (Rabi Crops) पेरणीस उशीर झाला होता. रबीच्या पेरणीत ज्वारी, गहू पिकासह सर्वाधीक हरभरा बियाण्याची पेरणी झाली आहे. रब्बीचा हंगाम चांगला येईल अशी शेतकरीला आशा आहे. परंतु मागील काही दिवसांपासून धुके, ढगाळ वातावरण व गारठ्याने रबीच्या पिकावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक परिणाम हरभरा पिकावर होताना दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rabi Crops
Petrol Pump : पंपावर लागले पेट्रोल संपल्याच्या पाट्या; वाहनधारकांच्या लांबचलांब रांगा

घाटे आळीचा हल्ला 

लवकर पेरणी झालेल्या व पाणी दिलेल्या हरभरा पिकावर घाटे आळीने हल्ला केला आहे. त्यामूळे शेती घाट्यात जाते की काय? याची चिंता (Farmer) शेतकरी व्यक्त करत आहे. यामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com